Mukhyamantri yuva udyami yojana maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी साडेसहा लाख रुपयापर्यंतचे अनुदान योजना बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण धरुनी आणि नवे उद्योजकांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना यांच्या संयुक्त माननीय योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून याबद्दलची सविस्तर माहिती.
आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो 7 जानेवारी 2019 च्या सुधारित नियमानुसार जर तुम्ही सेवा क्षेत्रात किंवा कृषी आधारित प्रक्रिया उद्योगात 20 लाख रुपयापर्यंत प्रकल्प सुरू करत असाल तर तुमच्यासाठी सरकारकडून 35% पर्यंत म्हणजे साडेसहा लाख ते सात लाखापर्यंत थेट अनुदानाच्या स्वरूपात पैसे मिळणार आहेत.
चला तर मित्रांनो या योजनेबद्दलची अधिक माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो जर तुम्ही सेवा क्षेत्रामध्ये काम करत असाल आणि जर तुमच्या प्रकल्पाची किंमत 20 लाख रुपये असेल आणि तुम्ही विशेष प्रवर्गात असाल अर्थात एससी एसटी ओबीसी आणि माजी सैनिक किंवा दिव्यांग यामध्ये येत असाल तर तुम्हाला ग्रामीण भागात पस्तीस टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजेच वीस लाखावर ते तुम्हाला सात लाख रुपये पर्यंतची सरकारच्या वतीने मदत करण्यात येणार आहे.
तसेच उत्पादन क्षेत्रासाठी जर तुम्ही काम करत असाल तर उत्पादनासाठी 50 लाख रुपयापर्यंत कर्ज मर्यादा आहे म्हणजेच तिथे 35 टक्के दराने तुम्हाला अनुदानाची रक्कम जिल्ह्यातील तसेच शहरी भागात जर तुम्ही व्यवसाय करीत असाल तर तुम्हाला विशेष प्रवर्गासाठी 25% अनुदान देण्यात येईल तर ग्रामीण भागातील प्रवर्गासाठी 35 टक्के इतके अनुदान देण्यात येईल तर मित्रांनो अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही आवश्यक कागदपत्रे व अटी वर्षातील पूर्ण करणे आवश्यक राहील.
तर मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू इच्छिता तर तुमचे किमान वय 18 ते 45 वर्षा दरम्यान असावे आणि तुमचे शिक्षण हे दहावी ते बारावी पर्यंत झालेले असावे व त्याचबरोबर लोकसंख्येच्या निकषावरती ग्रामीण भागातील प्रकल्पांना प्रथम प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर तुमच्याकडे सदरील कागदपत्रे आवश्यक आहेत जे की या योजनेचा अर्ज करताना तुम्हाला लागतील.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला जातीचा दाखला शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रकल्प अहवाल
अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तुम्हाला सीएमईजीपी किंवा पीएमईजीपी या अधिकृत पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल आणि आमच्या सोबत तुमचा सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करावे लागेल जिल्हा उद्योग केंद्र कडून अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तो अर्ज बँकेकडे शिफारसी साठी पाठवला जाईल आणि बँक कर्ज मंजूर केल्यानंतर काही दिवसांच्या प्रशिक्षणानंतर अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
त्याचबरोबर लोकांना स्वतःचा छोटा उद्योग जसे की पीठ गिरणी मसाला उद्योग दूध व्यवसाय किंवा सेवा केंद्र सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत लाभदायक अशी आहे त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा यासाठी तुमच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत किंवा मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
